Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती


सांगली (प्रतिनिधी)
संजय गांधी निराधार योजनेबाबत वंचित लाभार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ आज शांतीनगर परिसरातील सर्व माता भगिनींचा मेळावा घेऊन पार पडला.  या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना सांगलीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे उपस्थित होत्या.

मा. ज्योती आदाटे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे या भागातील महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवुन देता यावा यासाठी धडपड करीत आहेत. संजय गांधी निराधार योजने पासून जी लाभार्थी वंचित आहेत त्यांनी तातडीने कागदपत्राची पूर्तता करावी. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा कोणत्याही दलालाकडे प्रस्ताव करण्यास देऊ नये. हा प्रस्ताव करताना शासनाच्या सर्व अटी नियमांचा काटेकोरपणे पालन करावे. तसेच हा उपक्रम राबविण्यासाठी विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन ज्योती आदाटे यांनी यावेळी केले.

या आवाहनानंतर अर्जुन कांबळे यानी या भागातील सर्व प्रस्ताव स्वतः लक्ष घालुन पुर्ण  करून देण्याचे अभिवचन दिले.  या कार्यक्रमात दिव्यांग, महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फ़ोटीता कुमारिका, दुर्धर आजार असलेल्या माता भगिनीचा तसेच वृध्द निराधार यांचा समावेश होतां.  यावेळी मिरजच्या अध्यक्षा वंदना चंदनशिवे यांनीही मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे, युवतीच्या सरचिटणीस प्रणोती हिंगलजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ट कार्यकर्ते अॅड विलास बेले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments