Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड पोलिसांनी अवघ्या चार तासात चोरट्यास केले गजाआड


कुपवाड (प्रमोद अथणिकर)
दत्तात्रय मारुती साळुंखे वय ३५ मुळ रा.अंजनी ता. तासगाव सध्या रा. हनुमानगर कुपवाड याचे  बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्याने ७६ हजार.५०० रुपये किमतीचे चोरून नेले होते. या चोरट्यास अवघ्या चार तासातच कुपवाड पोलिसांनी गजाआड केले आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी दोन दिवसा पूर्वी हनुमानगर कुपवाड मध्ये चोरट्याने बंद असलेल्या घराचे दरवाजा तोडून ७६,५०० /- रु इतक्या किमतीचे दागिने चोरल्याचा प्रकार घडला होता. या वेळी कुपवाड पोलीस ठाण्याचे  सहा निरीक्षक अविनाश पाटील यांनी  खास पथक तयार करुन हद्दीतील संशयीत आरोपीना ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आली होते व यावेळी संशयीत इसम  म्हणून वैभव बसवेश्वर सन्नकी वय १९ रा. पाण्याचे टाकीजवळ कुपवाड यास ताब्यात घेवून त्याच्या कडून कसून चौकशी केली असता  त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. अवघ्या चार तासातच पोलिसांनी शिताफीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

       यानंतर गेल्या दोन दिवसात आरोपीपडून चोरीच्या मालाची वसूली करण्यात आली. आरोपीस  अटक करण्यात आली असून  त्यांचेकडील मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments