Daily Mahasatta

Daily Mahasatta

नितीन शिंदेचा भाजपला' रामराम ', मंत्री विश्वजीत कदम यांचे हस्ते केला प्रवेश
कडेगाव (सचिन मोहिते)
कडेगाव पलुस मतदार संघात राष्ट्रवादी पक्षात जोरदार प्रवेश सुरु झालेले आहेत . त्यात कडेगाव तालुका मात्र आघाडीवर आहे. याआधी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा राष्ट्रवादीत गेल्या होत्या तर त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत गेले होते . राष्ट्रवादीने  काँग्रेस भाजपाचे दिग्गज नेते खेचुन आणण्याचे काम केले आहे .परंतु  सोमवार दिनांक ०६ सप्टेंबर२०२१ रोजी
भाजपचे प्रभाग १७ मधील नेहमी ॲक्टिव असंणारे नगरसेवक नितीन शिंदे यांचा, काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. यांच्याबरोबर महेश शिंदे श्रीमंत शिंदे शंकर शिंदे धनाजी शिंदे, राजेंद्र शिंदे सचिन शिंदे संदीप शिंदे विकी पाटील यांनी देखील भाजपमधून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.  आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येकजण आपआपल्या परिने जागा करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे .यावेळी  शांताराम बापू कदम युवा नेते जितेश कदम यांच्यासह, सुरेश निर्मल , दीपक भोसले, हाजी फिरोज बागवान विक्रम देशमुख , असिफ तांबोळी ,
शिराज पटेल , अनिल जरग , शशिकांत रासकर आकाश धर्मे सांच्यासह सर्व नगरसेवक काँग्रेस प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती

निधी वाटपात भाजपकडून दुजाभाव आणि नगरसेवक म्हणून कोणतीही विचारपूस न केल्याने नगरसेवक नितीन शिंदे यांनी प्रभाग १७ मधील लोकांच्या हितासाठी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले आहे .

Post a Comment

0 Comments