Daily Mahasatta

Daily Mahasatta

संग्राम माने यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी केलेल्या आंदोलनाला मोठे यश


विटा (प्रतिनिधी)
         ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राज्य सरकारच्यावतीेने घेण्यात आला आहे.या निर्णयाबाबत ओबीसी हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने यांनी स्वागत केले आहे.तसेच या निर्णयास पाठींबा व्यक्त केला आहे.
         स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने रद्द झाल्याने ते आरक्षण परत मिळावे, यासाठी राज्यातील ओबीसी आक्रमक झाले होते. राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत होते.सांगली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या वतीेने संग्राम माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडण आंदोलन केले होते. संग्राम माने यांच्यासह राज्यभरात ओबीसी नेत्यांनी केलेल्या आंदोलनाला मोठे यश आल्याचे दिसून येत आहे.
         याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
        या निर्णयाचे ओबीसी हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने यांनी स्वागत केले असून शासनाने ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करुन ओबीसींना लवकरात लवकर राजकिय आरक्षण मिळवून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे तसेच याबाबत त्वरित अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा माने यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments