Daily Mahasatta

Daily Mahasatta

युवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी


विटा (प्रतिनिधी )
येथील हर्षवर्धन दिलीपराव बागल रा. लेंगरे यांची खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले .यावेळी खानापूर मतदार संघाचे माजी आमदार ऍड सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, कार्याध्यक्ष ऍड बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यावेळी खानापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन बागल यांची निवड झाल्याचे  जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जाहीर केले. हर्षवर्धन बागल हे उच्चशिक्षित असून त्यांनी फूड टेक्नॉलॉजी मध्ये बीटेक ची पदवी घेतलेली आहे.

हर्षवर्धन बागल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष स्वर्गीय दिलीपराव बागल यांचे पुत्र आहेत. तसेच त्यांचे आजोबा निवृत्ती गोविंद बागल उर्फ बागल भाऊ यांनी खानापूर पंचायत समितीचे सतरा वर्षे उपसभापती म्हणून काम पाहिले. तर जिल्हा परिषद सदस्य आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. लेंगरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच राधिका बागल यांचे हर्षवर्धन बागल हे पुत्र आहेत. हर्षवर्धन यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यातील जनसंपर्क, संघटन कौशल्य, अभ्यासू वृत्ती या गुणांचा विचार करून त्यांच्यावर खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

        या निवडीनंतर हर्षवर्धन बागल यांनी युवा नेते प्रतिक जयंतराव पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेतली. यावेळी प्रतीक पाटील यांनी त्यांना पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा, आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. नुतन तालुकाध्यक्ष हर्षवर्धन यांचे पालक मंत्री जयंतराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील जिल्हा कार्याध्यक्ष ऍड बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, ऍड. संदीप मुळीक 
यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे खानापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments