Daily Mahasatta

Daily Mahasatta

सागरेश्वर अभयारण्यात निसर्ग सफारी बसचे लोकार्पण


कडेगाव (सचिन मोहिते)
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात निसर्ग  सफारीच्या उद्देशाने वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजवलेल्या निसर्ग सफारी बसचे लोकार्पण आज राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ. जितेश कदम , विभागीय वन अधिकारी विशाल माळी, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हे वनमंत्री असताना सागरेश्वर अभयारण्यात पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी बांबु कुटी व विश्रामगृह आदी सुविधा निर्माण केल्या. येथील स्वागत कमान, वन्य जीव माहिती केंद्र, अभयारण्याच्या चित्ररूप दर्शनासाठी ॲम्फी थिएटर उभारली. तसेच अभयारण्यातील ओढे आणि ओघळीवर बंधारे घालून  वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून दिले. यामध्ये ताकारी योजनेचे पाणीही सोडले आहे.

अभयारण्य विकसित करण्यासाठी कोट्यवधींचा निधी त्यांनी दिला. निसर्ग सफारी बससेवा सुरु करण्याची संकल्पनाही डॉ.पतंगराव कदम यांचीच होती. या बससाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १३ लाख रुपयांचा निधी दिला आहे . आता ही बससेवा सुरू झाली आहे. यामुळे  येथील निसर्ग सफारीचा पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

Post a Comment

0 Comments