Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातील अटल चोरट्यांची टोळी जेरबंद, १४ मोटर सायकल जप्त


सांगली (प्रतिनिधी)
सांगली येथील नेमीनाथ नगरचे क्रिडा पटांगणाजवळ तीन तरुण संशयितरित्या थांबले असून त्यांचे ताब्यातील मोटर सायकल हया विक्री करण्याच्या उद्देशाने तेथे आले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत १) सुमीत मारुती सिंदगी वय १९ वर्षे धंदा मजुरी रा.कर्नाळ रोड माधवनगर २) अशिष गजानन मोरे वय १९ वर्षे धंदा मजुरी रा. कुल्लोळी हॉस्पीटल मागे विश्रामबाग, सांगली ३) अनिस यासीन मुजावर वय १९ वर्षे धंदा मजुरी रा. चैतन्यनगर, संजयनगर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत या आरोपींकडून १४ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मोटर सायकल या सांगली जिल्हयातील विविध पोलीस ठाणे हद्दीतुन चोरीस गेलेल्या आहेत.

पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबले यांच्या मार्गदर्शनाखाली
पोनि / सर्जेराव गायकवाड, सपोनि / निरज उबाळे, सपोनि / प्रशांत निशानदार, पोफी / नवनाथ दांडगे जितेंद्र जाधव, सागर टिंगरे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, संकेत मगदुम, मच्छिंद्र बर्डे, संदिप गुरव, संदिप पाटील, इम्राण मुल्ला, हेमंत ओमासे, अजय बॅदरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments