Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा बँको पुरस्काराने सन्मान

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने देशातून 450 बँकांपैकी पाचशे ते हजार कोटींच्या दरम्यान उलाढाल  असणाऱ्या बँकांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. यामुळे सर्व संचालक मंडळ व सभासदांची मान उंचावली असल्याने सहकार क्षेत्रात अटकेपार झेंडा फडकल्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन चेअरमन यु. टी . जाधव यांनी केले.

शिक्षक बँकेस बँको गॅलक्सी इन्मा असोशिएशन मार्फत ५०० ते १००० कोटीपर्यंत उलाढाल असणाऱ्या बँकांत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरविण्यात आले. शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासद, कर्जदार, ठेवीदार यांच्यासाठी खात्रीशीर उपयुक्त नाविन्यपूर्ण योजना, सुव्यवस्थापन, संस्था वाढीसाठीचे प्रयत्न, सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्याने सदरच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा १ सप्टेंबर रोजी म्हैसुर येथे म्हैसुरचे केंद्रीय रस्ते व वाहतूक संनियंत्रण सामितीचे सदस्य व खासदार प्रताप सिम्माजी यांचे हस्ते वितरण करण्यात आले. 

यावेळी बँको गॅलॅक्सीचे अशोक नायक, अविनाश शिंत्रेजी आदी मान्यवर उपस्थित होते. सदरचा पुरस्कार चेअरमन यु टी . जाधव, व्हा . चेअरमन राजाराम सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले, माजी चेअरमन व विद्यमान संचालक रमेश पाटील, महादेव माळी, बाळासाहेब आडके आदींनी स्वीकारला.

Post a Comment

0 Comments