Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रतिक पाटील अनुकंपा तत्वावर मंत्री झाले : विशाल पाटील


ः सांगलीत वसंतदादा गटाचा र्काकर्ता मेळावा संपन्न

सांगली (प्रतिनिधी)
आमचे थोरले बंधू प्रतिक पाटील यांना  स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा वारसदार म्हणून अनुकंपा तत्वावर मंत्रीपद आणि राजकारणात संधी मिळाली. मात्र नंतर ती त्यांनी नाकारली. आता अनुकंपाची एक संधी संपली आहे. आता आम्ही राजकारणात जे मिळवणार ते कठोर परिक्षा देऊनच मिळवू, त्यासाठी कार्यकर्त्यांनी  बळ द्यावे, असे आवाहन वसंतदादा पाटील कारखान्याचे चेअरमनन विशाल पाटील यांनी केले.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत दादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँगेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. विशाल पाटील हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी ईच्छूक होते. मात्र त्यांना जिल्हाध्क्षपद न देता त्यांची प्रदेश उपाध्क्षपदी  निवड झाली. विशाल पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे स्वर्गीय वसंतदादा पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा आज सांंगलीत स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधिस्थळी दिशा संवाद मेळावा पार पडला. यावेळी जिल्हातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी विशाल पाटील त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, काही काळापूर्वी दोन बंधू माझ्याकडे आले. त्यांनी आमचे वडील वारले आहेत, माझ्या धाकट्या बंधूला त्यांच्या जागेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी द्यावी असे सांगितले. परंतू धाकट्या भावाचे वय बसत नसल्याने थोरला बंधू नोकरीला लागला. मात्र काही काळातच नोकरीत मन रमत नव्हते म्हणून त्यांने राजीनामा’ दिला आणि माझा धाकट्या भावाला माझ्या जागेवर घ्या, असा आग्रह धरू लागला. मात्र प्रशासनाने त्यांना कळवले की अनुकंपाचा लाभ एकदाच मिळतो. त्यामुळे त्याला नोकरी देता आली नाही. पण काही महिन्यातच मी बँकेत गेल्यावर तो धाकटा बंधू पुन्हा बँकेत दिसला. त्याला विचारल्यावर त्यांने सांगितले, साहेब मला अनुकंपावर नोकरी नाही मिळाली मात्र मी अभ्यास करून, कष्ट करून नोकरीत दाखल झालो. ही गोष्ट सांगून विशाल पाटील म्हणाले, आमचे घराचे देखील असेच झाले आहे. प्रतिकदादांना स्वर्गीय वसंतदादांच्या कृपेने अनुकंपावर एकदा मंत्रीपद मिळाले, मात्र आता आपल्याला राजकारणातील पदे परिक्षेने आणि कष्टानेच मिळावावे लागणार,असे विशाल पाटील यांनी सांगितले.

विशाल पाटील म्हणाले, वंसतदादा घराण्याचे राजकारण सत्तेवर अवलंबून नाही. तसेच वसंतदादांचा विचार पैशावर चालणारा विचार नाही. प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाले म्हणून  नाराजी नव्हती तर चर्चा करून निर्णय घ्याचा होता. आज आपण चर्चा करून निर्णय घेत आहोत. तुम्हाला पक्षाकडून मिळालेले हे पद मान्य आहे का ? असा प्रश्न विचारताच कार्यकर्त्यांनी  जल्लोष करत विशाल पाटील तुम आगे बढो अशा घोषणा दिल्या आणि पाठिंबा दर्शवला. त्यानंतर वंसतदादा गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला गरज असताना भांडत न बसता एकजूटीने काम करण्याची ग्वाही दिली.


Post a Comment

0 Comments