Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखेर सांगली जिल्ह्यातील शाळा भरण्याचा मार्ग खुला, वाचा काय आहेत शिक्षणाधिकारी यांचे आदेश


सांगली (प्रतिनिधी)
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या भीषण संकटामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा उघडण्याचा मार्ग खुला झाला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी पहिली पासून पुढचे वर्ग सुरू करा, असे आदेश दिले. मात्र  शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठविण्यास तयार आहोत, असे संमतीपत्र पालकांकडून लिहून घ्यावे असेही आदेशात म्हटले आहे.

राज्यभरात कोरोना चे संकट सुरू झाल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दीड वर्षात या शाळा पूर्णता बंद राहिल्या. मात्र सांगली जिल्ह्यात आता कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात आता तीनशे ते चारशे इतके दररोज सरासरी रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दिड वर्षाच्या तुलनेत हे रुग्ण कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने सर्व शाळा सुरू कराव्यात अशी मागणी पालक आणि संस्था यांच्याकडून होती.

त्यानुसार आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक झाली यावेळी पालक आणि शाळा समितीची संमती असेल तर वर्ग भरावा असे ठरविण्यात आले त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश जारी केले. तसेच पालकांकडून मी आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहे, असे संमतीपत्र घ्यावे असे आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

1 Comments

  1. शाळे चालू केल्या मुळे जास्त कोरोनात वाढ होईल

    ReplyDelete