Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवाजीराव कदम पतसंस्थेच्या गृहलक्ष्मी ठेव योजनेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न


वाळवा (रहिम पठाण)
शिवाजीराव कदम सह.नागरी पतसंस्था,मसुचीवाडी गृहलक्ष्मी ठेव योजनेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. उध्दव कदम प्रमुख उपस्थित होते.

महिला सबलीकरणासाठी संस्थेच्या माध्यमातून गृहलक्ष्मी ठेव योजना 2001 पासून सुरु केली आहे. बचती सवय लागावी व स्वतःच्या पायावराती उभ्या रहाव्यात हीच या योजनेच्या पाठीमागील मूळ संकल्पना  आहे,असे उध्दव कदम म्हणाले.

प्रत्येक वर्षी  विशेष बक्षीस दिले जाते तर सहभागी सर्व महीलांना संस्थेकडून भेट वस्तू दिली जाते यावर्षी विशेष बक्षिस पुढील प्रमाणे सौ.अनिता विजय कदम,सौ विद्या  सिध्दनाथ पाटील,सौ.स्वाती सुदीप कदम, सौ.वनिता मोहन देसाई,सौ.शारदा जयसिंग देसाई. याना विशेष बक्षिस देण्यात आले.
समारंभासाठी चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक संस्था सेवक उपस्थित होते. स्वागत प्रकाश कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन  ज्योती आंबी यानी केले. आभार अभिजीत मांगलेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments