Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रहार जनशक्ती पक्षात आले नवचैतन्य, ९८ वर्षाच्या चिरतरुण क्रांतिकारकांची पक्षात एन्ट्री


सांगली (प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पक्ष म्हणजे तरुण आणि सळसळत्या रक्ताच्या लोकांचा पक्ष अशी राज्यभरात प्रतिमा आहे. आता या पक्षात तब्बल ९८ वर्षाच्या एका चिरतरुण क्रांतिकारकांने एन्ट्री केली आहे. त्यामुळे पक्षात आणखी नवचैतन्य निर्माण झाले आहे, अशा भावना प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी व्यक्त केले आहेत.

जिल्हाध्यक्ष सुनील सुतार म्हणाले, क्रांतीकारकांचा  जिल्हा म्हणुन स्वातंत्र्य चळवळीमध्ये  देशभरात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण सातारा म्हणजे आजच्या सांगली जिल्हातुन नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या पक्षाचा पहिला सदस्य नोंदणी अर्ज हा स्वातंत्र्यसेनानी  माधवराव भुजंगराव माने यांचा अर्ज भरुन प्रहार पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आजपासुन सुरवात झाली. ९८ वर्ष वय असलेल्या स्वातंत्र्यसेनानी  माधवराव भुजंगराव माने
यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सोबत त्यांनी तुरुंगवास भोगला होता. अशा थोर लोकांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अजून बळकट होईल. शिवाय प्रहार सोबत अशी थोर माणसं विश्वासाने जोडली जात आहेत ही सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारी गोष्ट आहे, असे मत जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी व्यक्त केले.


यावेळी सांगली महानगर पालिका क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तोहिद भाई शेख, श्री. उदय ओमकार, रवी पाटील, शहाबुद्दीन हेरवाडे, रियाज  मुजावर यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील  सुतार, सां.मि.कु. महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष मुनीर मुल्ला, युवक जिल्हाध्यक्ष ओम भोसले, अमित पवार, सुरेश भिंगारदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत नावनोंदणी करून पक्षात जाहीर प्रवेश केला.
  जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने यापुढील काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी करून भरीव कामगिरी करण्याचा निश्चय यावेळी उपस्थितांमध्ये करण्यात आला.
  

Post a Comment

0 Comments