Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या वारसांना विटा पालिकेकडून विविध योजनांचा लाभ


विटा (प्रतिनिधी)
विटा नगरपालिकेत ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. यानंतर कोव्हीड काळात मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबास मदतीचा हात देत मृत कोव्हीड रुग्णांच्या वारसांना विटा नगर परिषदेच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
         १५ ऑगस्ट चे औचित्य साधून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोव्हिड रुग्णाच्या वारसांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत धनादेश वाटप, दिव्यांग व्यक्तींचे अनुदान वाटप, मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र, मालमत्तेचे उतारे इ. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन करून योजनांचे लाभ देण्यात आले.
     कोरोना काळात विविध रुग्ण मृतांच्या कुटुंबात आर्थिक दुर्बलता आली होती. त्यांच्या उदरनिर्वाहकरिता विशेष अर्थसहाय्य करण्यात आले. व पुन्हा एकदा विटा नगरपरिषदेने माणुसकी जपून युवा पिढीसमोर किंबहुना संपूर्ण शहरात आदर्शवादी कार्य केले. सर्व लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ नगराध्यक्षा सौ प्रतिभा ताई पाटील व नगरसेविका यांच्या हस्ते देण्यात आला
            या कार्यक्रम प्रसंगी माजी आम. सदाशिवराव भाऊ पाटील, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा वैभव पाटील, स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर मा. वैभव दादा पाटील, मुख्याधिकारी मा. अतुल पाटील, सन्माननीय आजी माजी सदस्य,नगरपरिषद सर्व अधिकारी व पदाधिकारी, कर्मचारी,शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments