Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीतून अकरा ठरावांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार


सांगली जिल्ह्यासाठी पूर नियंत्रण समिती तातडीने स्थापन करावी, यासह अकरा ठरावांचे निवेदन मुख्यमंत्री, अन्य मंत्र्यांना देणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.
सांगली, (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती चे नियंत्रण करण्यासाठी कायमस्वरूपी पूर नियंत्रण समिती तातडीने स्थापन करावी, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी अकरा ठरावांचे निवेदन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांना देण्यात येणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

बैठकीला आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, पाटबंधारे खात्याचे निवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, हणमंतराव पवार, अजित (पापा) पाटील, सतीश साखळकर, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
बैठकीतील ठराव असे,
1. सांगली जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी पूर नियंत्रण समिती तातडीने स्थापन करावी. समितीचा नियमन, नियंत्रण, कायदा यामध्ये समन्वय असावा. त्याला कायदेशीर स्वरूप असावे.
समितीच्या संरचनेमध्ये पदसिध्द सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी, तसेच यामध्ये सदस्य म्हणून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, छोटे पाटबंधारे  विभागाचे कार्यकारी अभियंता, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे शहर अभियंता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी, तसेच पूर विषयाचे 2 तज्ञ, स्वयंसेवी संस्था (पूरामध्ये काम करणारे) 2 प्रतिनिधी, अशासकीय सदस्य 3 आदिंचा समावेश असावा.  या समितीची किमान 2 महिन्यातून एक बैठक व्हावी.
2.  सांगली शहरातील व शहराभोवतीचे पुर्वीचे 16 नैसर्गिक नालेही अडथळेमुक्त करून ते वाहते करावेत. बफर झोन आणि ब्ल्यू लाईनमध्ये यापुढे नव्याने बांधकामे होऊ नयेत यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी.
3.  सध्या कमीत कमी कालावधीत प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळे कृष्णा खो-यातील सर्व धरणामधील केंद्रिय जल आयोगाच्या तत्वानुसार 31 मे रोजी धरणच्या क्षमतेच्या 10 टक्के, 31 जुलै रोजी 50 टक्के, 31 ऑगस्ट रोजी 77 टक्के व 15 सप्टेंबर नंतर पाऊसमानाचा अंदाज घेवून क्षमतेच्या 100 टक्के धरण भरावे. त्याचवेळी अलमट्टी धरणामधील पाणी पातळी 31 ऑगस्ट पर्यंत 516 मीटर ठेवावी.  वीज निर्मीतीसाठी आधीच जादा पाणी साठा करून नये.
4.  पूर काळात सिंचन योजनांचे पंप बंद पडतात, त्यामुळे पुराचे पाणी उचलून दुष्काळी भागात सोडता येत नाही. तेव्हा पूर काळातही पंप सुरू ठेवण्याची सक्षम यंत्रणा उभी करावी. या पुराचे पाण्याने दुष्काळ भागातील तलाव भरूण घ्यावेत. ट्रान्सफार्मर उंच ठिकाणी उभा करावेत.
5.  पाऊस आणि पाण्याबाबतचा अंदाज अचूकपणे येण्यासाठी आणि नागरिकांना अलर्ट करण्यासाठी अध्यावत रियल टाईम यंत्रणा उभी करण्यात यावी. यासाटी जीपीएस बेस्ड इन्फॉरमेशन सिस्टीमचा वापर करावा. मुक्त पाणलोट क्षेत्रात प्रत्येक 10 कि. मी. अंतरावर रेनगेज स्टेशन व विसर्ग मोजण्याची अद्यावत यंत्रणा उभी करावी.
6.  पूर काळात पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटतो. त्यासाठी सांगली शहराजवळच्या बायपास पुलापासून माधवनगर रस्त्यापर्यंत फ्लायओव्हर बांधण्यात यावा. यासाठी तातडीने आर्थिक तरतूद करावी.
7. नवीन मोठ्या पुलांचे किंवा मोठ्या रस्त्यांचे बांधकाम प्रचंड भरावाचे नको. पुलाखालून कमीत कमी वेळेत भरपूर पाणी वाहून गेले पाहिजे. त्यासाठी नव्या पद्धतीच्या पुलाचे डिझाईन करावे.
8. रोहिणी नक्षत्राच्यावेळी नदीवरील धरणाच्या / बंधाऱ्याच्या खालच्या फळ्या काढण्याचा नियम आहे. त्याप्रमाणे या फळ्या काढल्या जात होत्या. परंतु अलिकडच्या काळात त्या काढल्या जात नाहीत, त्यामुळे पाण्याचा तुंब वाढतो, आणि पुरही वाढतो. यासाठी वरील काळात सदर फळ्या काढल्या जाव्यात.
9. कृष्णा, वारणा नदीकाठच्या जमीनीची धूप थांबविण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने जागोजागी बांबूच्या रोपांची लागवड करणेस शेतक-यांना प्रवृत्त करावे. त्यासाठी नदीकाठच्या शेतक-यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.  त्यामुळे नदीचे काठ सुरक्षित होतील. 
10. पाच जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन केंद्र सांगलीला मंजूर आहे.  त्सासाठी महानगरापलीकेच्या जागेवर त्यांचे कार्यालय व आपत्ती निवारण केंद्र उभारणेत यावे.  यासाठी मदत व पुर्नवसन विभागाकडून अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद व्हावी.
11. नदी, नाले, गटारी यामधून साचणारे प्लॅस्टिक पुराचा धोका आणखी वाढवते. त्याकरीता प्लॅस्टिक बंदी सक्तीची करावी.

Post a Comment

0 Comments