Daily Mahasatta

Daily Mahasatta

भाळवणी पंचक्रोशीचे अर्थचक्र गतिमान करणार : प्रतापराव शेठ (दादा) साळुंखे: शिवप्रताप  मल्टिस्टेटच्या भाळवणी शाखेचे उदघाटन

विटा प्रतिनिधी
शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून भाळवणी आणि पंचक्रोशीतील अर्थचक्र गतिमान करणार आहोत, अशी ग्वाही शिवप्रताप चे संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ दादा साळुंखे यांनी दिली. येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेच्या भाळवणी शाखेचे उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. 

प्रताप शेठ साळुंखे म्हणाले, संस्थेने अल्पावधीत मोठा विश्वास संपादन करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आपला  विस्तार केला आहे. पण आपल्या भागाशी संस्थेची नाळ कायम आहे. आपल्या भागातील लोकांना विशेषतः महिला व युवकांच्या हाताला काम मिळून ते आत्मनिर्भर झाले पाहिजेत म्हणून आपण भाळवणीला शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पासून शिवप्रताप पतसंस्था ही आपल्या सर्व आर्थिक गरजा भागवणेसाठी  अग्रभागी असेल.

इथले लोक शेती बरोबर उद्योग क्षेत्रात प्रविण आहेत. शोभेची दारू व फॅब्रिकेशन व्यवसायात गावचे नावं महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. शेतीसह  या उद्योगाला चालना  देऊन  अर्थचक्र अधिक गतिमान केले  जाईल. 

यावेळी प्रस्ताविक कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी केले . संस्थेचा व्यवसाय २८५ कोटी असून ठेवी १६५ कोटी कर्जे १२१ कोटी, गुंतवणूक ६० कोटी नफा १ कोटी ८१ लाख,सभासद संख्या १५००० च्या आसपास असून ऑडिट वर्ग सतत "अ" व १५ आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. तर संस्थेच्या मुख्यकार्यालायच्या इमारतीचे  विटा येथे मध्यवर्ती जागी बांधकाम चालू आहे. लवकरच ते पूर्णत्वास1 जाईल असे सांगितले संस्था केवळ ठेवी व कर्जे इतकेच कार्य करीत नसून एन इ एफ टी/आर टी जी एस/आय एम पी एस सुविधा तसेच फोन बिल,लाईट बिल भरानेची सुविधा, पॅन कार्ड काढणे,विमा हप्ता भरणे, फास्ट टॅग काढणे इत्यादी सेवा देणार आहोत, असे विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुलभा अदाटे
पंचायत समिती सदस्य संजय मोहिते,  माजी सरपंच महेश घोरपडे,  सरपंच विमल ताई माळी, सोनहिरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सयाजीराव धनवडे, बल वडी चे सरपंच मा. प्रवीण पवार ,कळंबीचे उपसरपंच उत्कर्ष कदम, नितीनराजे जाधव, केशवराव धनवडे मारुती पवार, धनाजी शिंदे माजी सरपंच, राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य, जयसिंग शिंदे,सागर सूर्यवंशी, माजी सरपंच राजेंद्र निकम,नेताजी शिंदे, अरविंद बापू गायकवाड, उत्तमराव गायकवाड, दीपक पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments