Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील डॉ. प्रशांत दाते यांना नॅशनल बेस्ट टीचर अवॉर्ड


विटा (प्रतिनिधी)
      विटा नगरीचे सुपुत्र डॉक्टर प्रशांत दाते यांना शल्य शास्त्रातील नॅशनल बेस्ट टीचर  अवॉर्ड" ने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर आणि आमदार लहू कानडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

विटा येथील डॉक्टर प्रशांत दाते हे सांगली शहरात संजीवन हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली १२ वर्षे रुग्णांना सेवा देत आहेत. तसेच आण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलेज, आष्टा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आयुर्वेद टीचर असोसिएशन ऑफ इंडियाने त्यांना नॅशनल बेस्ट  टिचर अवॉर्ड ने पुणे येथे सन्मानित केले. शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर आणि आमदार लहू कानडे यांच्या हस्ते डॉक्टर दाते यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
        डॉ. दाते हे विटा येथील सेवानिवृत्त शिक्षक दगडू दाते ( दाते गुरुजी) यांचे चिरंजीव तसेच एलआयसी चे अधिकारी प्रवीण दाते यांचे बंधू आहेत. डॉक्टर दाते यांच्या सन्मानामुळे विटा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Post a Comment

0 Comments