Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोना आटोक्यात

सांगली (प्रतिनिधी,)

सांगली जिल्ह्यात आज रविवार ता. १५ ऑगस्ट रोजी ४६० रुग्णांचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात पंधरा रुपयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरणा आटोक्यात येत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत सातत्याने काही प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. आज आकडा कोरोनाग्रस्तांचा आकडा ४६० पर्यंत खाली आला आहे तर मृत्यूचे प्रमाण देखील कमी होऊन दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात तालुकानिहाय आढळून आलेले कोरोनाचे रुग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी २७, जत २१, कडेगाव ७८, कवठेमंकाळ ६९, खानापूर ३५, मिरज ४२, पलूस ११, शिराळा २, तासगाव ७४, वाळवा २० तसेच  सांगली शहर ६५,   मिरज शहर १६ असे जिल्ह्यात एकूण ४६० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिराळा तालुक्यात आज सर्वात कमी म्हणजेच केवळ २ रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments