Daily Mahasatta

Daily Mahasatta

आरोग्य सेविकेच्या हस्ते ध्वजारोहण, पेठ गावातील नवा आदर्श


पेठ ( रियाज मुल्ला):
पेठ तालुका वाळवा येथील मुस्लिम जमात पेठ च्या वतीने येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका - आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.
  
कोरोनाच्या काळात  घरोघरी जाऊन आरोग्य सेविका -आशा वर्कर यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याची  दखल घेऊन मुस्लिम जमात च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
   
पेठ येथील  उर्दू शाळेतील ध्वजारोहण आरोग्यसेविका दिपाली कुंभार यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक फिरोज ढगे यांनी केले तर आभार मौलाना रिजवान जमादार यांनी मानले.
  
याप्रसंगी मुस्लिम जमात चे चेअरमन जावेद ढगे, माजी उपसरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच अमीर ढगे, व्हा. चेअरमन इसाक संदे, शमशुद्दीन संदे, इरफान ढगे रमजान मुल्ला, हारून मुल्ला, नासिर ढगे, मेहबूब शेख,रियाज मुल्ला, मुनिर जमादार, हाफिज आरिफ जमादार,रहीम मुजावर, मुसा ढगे, इफतेकार नदाफ,पेठ आरोग्य केंद्राच्या आशा सेविका-आशा वर्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments