Daily Mahasatta

Daily Mahasatta

रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

श्री रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा देताना सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील व इतर मान्यवर.

सांगली (प्रतिनिधी)
सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक औषध उद्योग असे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले श्री रावसाहेब जिनगोंडा  पाटील यांचा वाढदिवस ९ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मनाळ येथील पूरग्रस्त भागात औषध फवारणी करण्यात आली.  शामराव नगर सांगली येथील अंगणवाडी मधील लहान मुलांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले . कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्थेच्या वतीने सर्व शाखांच्या मधून वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली.
श्री रावसाहेब पाटील यांच्या या वाढदिनी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून अथवा दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री माननीय नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील दादा बोरगावकर यांनी  श्री रावसाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील ,तसेच भिलवडी चे माजी सरपंच विजय आण्णा चोपडे, उद्योजक श्री भालचंद्र पाटील समडोळी चे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश पाटील ,केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी आणि विविध केमिस्ट त्याच पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर व कर्मचारी वर्ग यांनी भेटून शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सेक्रेटरी श्री नितीन खाडिलकर ,एन डी बिरनाळे आणि विनोद पाटोळे, राजगोंडा पाटील नांद्रे, महावीर पाटील नांद्रे, श्री राजू चौधरी , मिलिंद चौधरी ,रजपूत अकॅडमी चे प्राध्यापक एम एस राजपूत सर यांनी शुभेच्छा दिल्या जैन बोर्डिंग चे चेअरमन श्री राहुल चौगुले व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी चे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुहास पाटील व इतर पदाधिकारी मनन कन्स्ट्रक्शन चे श्री सागर वडगावे वर्धन बिल्डर चे सुनील पाटील त्याचप्रमाणे इचलकरंजीचे नगरसेवक श्री दलवाई यांच्या सह मान्यवरांनी रावसाहेब पाटील यांना  शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments