Daily Mahasatta

Daily Mahasatta

कवी लवकुमार मुळे यांचा साहित्य सेवा मंचच्यावतीने सत्कार


जत ( सोमनिंग कोळी )- जत तालुक्यातील शेगाव येथील कवी लवकुमार मुळे यांच्या कवितासंग्रहांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंच,जतच्यावतीने चिंच विसावा येथे सत्कार करण्यात आला. मुळे यांच्या 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे' व 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' या कवितासंग्रहांना शब्दांगन संस्था, चंद्रपूरचे यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार  मिळाला आहे.

साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार किरण जाधव, साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, प्रा, कुमार इंगळे, 'चिंच विसावा'चे व्यवस्थापक  प्रल्हाद बोराडे, सौ,बोराडे. अनिकेत ऐनापुरे आदी उपस्थित होते.लवकुमार मुळे शेगाव यांचे आतापर्यंत 'गुलमोहर' , 'भावमुद्रा', 'काळीजवेणा', 'अर्ध वेलांटी', 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे', 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

'कोलाहल' व 'आत्म संवादाचे पांढर पक्षी' हे संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांना शब्दांगण पुरस्कार( मिरज), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा विशेष पुरस्कार ,कै सुरेश कुलकर्णी पुरस्कार, औदुंबर सहित्याज्योती पुरस्कार (बीड), श्रीमती शहाबाई यादव साहित्य पुरस्कार (रेनावी), बेळगावचा वाङ्मय चर्चा मंडळाचा कृ. ब. निकुंभ साहित्य पुरस्कार मिळाले आहेत तर साहित्य प्रतिष्ठान, पुणेचा प्रतिभा गौरव पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे.

Post a Comment

0 Comments