Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली बाजार समितीच्यावतीने वसुंधरा बारवे यांना कोरोना योद्धा पुरस्कार


सांगली ( प्रतिनिधी)
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली तर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बर्वे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सहकार भवन वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली येथे हा कोरोना योध्दांंच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.

बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व संचालिका मा. सौ. जयश्री यमगर (पाटील) यांच्या हस्ते वसुधंरा बारवेसो, (जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली) यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मानचिन्ह, शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उर्मिला राजमाने (सहा निबंधक सहकारी संस्था, सांगली), डी. एस. कुंभार (तहसिलदार मिरज), राहुल रोकडे (उपायुक्त, सांगली मिरज कृपवाड शहर महानगरपालिका)   सुनिल आंबोळे (वैदयकीय आरोग्य अधिकारी) अजय सिंदकरसो, (पोलीस निरीक्षक सांगली), मा. अनिल तनपुरेसो (पोलीस निरीक्षक)  शरद शहा (अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स सांगली)  मुजीरभाई जांभळीकर , शितल पाटील,  प्रशांत पाटील, हरिदास पाटील ( नगरसेवक ) जालिंदर यादव , आप्पासाहेब सरगर( गटविकास अधिकारी मिरज) बाळासाहेब बंडगर, महेश चव्हाण , वजीर जांभळीकर राजू नलवडे यांचा कोरोना योध्दा म्हणून बाजार समितीच्या वतीने सन्मानचिन्ह व शाल बुके देवून सत्कार करणेत आला.

सदर कार्यक्रमाला बाजार समितीचे उपसभापती तानाजी पाटील, संचालक वसंतबापू गायकवाड, जिवन पाटील, आण्णासाहेब कोरे, देयगॉड बिरादार प्रशांत शेजाळ, अभिजीत चव्हाण, अजित बनसोडे व  कुमार पाटील माजी संचालक दादासाहेब कोळेकर तसेच बाजार समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी मार्केट यार्डातील, आडते, व्यापारी हमाल व तोलाईदार इत्यादी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments