Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडातील कापड व्यापाऱ्यांला लाखोंचा गंडा, इचलकरंजीच्या पिता-पुत्रा वर गुन्हा दाखल


कुपवाड (प्रतिनिधी)  
कुपवाड मधील प्रसिद्ध व्यापाऱ्यांला इचलकरंजी च्या पिता-पुत्रा ने वेळोवेळी माल उचलून एकूण ९ लाख ४२ हजार ८८७ रुपयास गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.
     कुपवाड परिसरातील औद्योगिक वसाहत मध्ये असणाऱ्या उमेद टेक्सटाईल चे मालक सतिश नेमिचंद मालु वय ४८, धंदा - कापड व्यवसाय सांगली, ता. मिरज  यांचा विश्वास संपादन करुन इचलकरंजी  रामस्वरूप बोहरा व त्यांचा पुत्र अंकित रामस्वरूप बोहरा या दोघांनी कॉटर्न यार्न (८एस) च्या ११७ बॅगा खरेदी घेतल्या असून त्याची एकूण  किंमत  ९ लाख ४२ हजार ८८७ रुपयास न देता त्यांची आर्थिक फसवणुक करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरामुळे कापड व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले असून व्यापाऱ्यां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
    या पिता पुत्राना फसवणूक प्रकरणी अद्याप अटक झालेली नाही.

Post a Comment

0 Comments