Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत तणाव, आमदारांच्या कार्यालयासमोरच मंत्री नारायण राणे यांच्या पोस्टर वर शाई फेकली

सांगली (प्रतिनिधी)
सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर असलेल्या केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्या होल्डिंगवर सकाळी कार्यालय बंद असताना शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांनी शाई फेकली. याघटनेच्या निषेधार्थ आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालया समोर  मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला  दुग्धाभिषेक घातला व  संबंधित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर  त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करणेबाबत तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. या घटनेनंतर सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

यावेळी संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, सचिव विश्वजीत पाटील, सरचिटणीस केदार खाडिलकर, गटनेते विनायक सिंहासने, संजय यमगर, संजय कुलकर्णी, कृष्णा राठोड रघुनाथ सरगर, अमित गडदे, गणपती साळुंखे, प्रियानंद कांबळे, अनिकेत खिलारे, प्रथमेश वैद्य, शीतल कर्वे, दरीबा बंडगर, शांतिनाथ कर्वे, राहुल माने, श्रीकांत वाघमोडे, सुजित राऊत, अमित देसाई, चेतन  माडगूळकर, जितेंद्र मुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments