Daily Mahasatta

Daily Mahasatta

सेवासदन हॉस्पिटलची ' सायकल बँक ' योजना, सांगलीत होतय आदर्श उपक्रमाचे कौतुक


सांगली ( प्रतिनिधी)
१५ ऑगस्ट २०२१ दिवशी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि सेवासदन हॉस्पिटल मार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सेवासदन फाउंडेशन मार्फत महानगरपालिकेच्या ६ आणि जिल्हा परिषदेतील ५ अशा एकूण ११ विद्यार्थ्यांनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध पिल्याने आजच्या समाजात ताठ मानेने जगात येते. स्वतःची, आपल्या कुटुंबीयांची आणि पर्यायाने समाजची प्रगती साधता येते. तेंव्हा मुलींनी शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे." असे उदगार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक श्री.विवेक कांबळे यांनी काढले. सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि सेवासदन हॉस्पिटलचे डॉ. रविकांत पाटील यांनी सायकल बँक योजनेबाबत माहिती सांगितली आणि जास्तीत जास्त लोकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे आणि मुलींना सक्षम करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले.
तसेच या शुभप्रसंगी सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि सेवासदन हॉस्पिटल मार्फत हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येइतके म्हणजे साधारण १००० रोपांचे वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.  या उपक्रमाची सुरुवात म्हणून सेवासदन हॉस्पिटलजवळील महानगरपालिकेच्या जागेत ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सेवासदन मार्फत ओक्सिजन पार्क निर्मितीची संकल्पना या वेळेला डॉ. रविकांत पाटील यांनी व्यक्त केली. ओक्सिजन पार्क मध्ये अश्या विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण केले जाईल ज्या अधिक ओक्सिजन देणाऱ्या व अधिक कार्बन डायोक्सईड शोषून घेणाऱ्या असतील. या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. रविकांत पाटील यांनी कोरोना काळातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आपल्याला पर्यावरण बदलाचे दुष्परिणाम मनुष्यावर किती भयंकर होतात आणि पुढे हि होऊ शकतात याची जाणीव झाली असल्याचे नमूद केले. पर्यावरण बदल रोखण्यासाठी प्रत्येकाने जाणीव पूर्वक प्रयत्न करने गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.  यावेळी प्रमुख पाहुणे माजी महापौर विदयमान नगरसेवक मा.विवेक कांबळे उपस्थित होते.त्यांनी सेवासदन फाउंडेशनचे कौतुक केले.यावेळी सेवासदन फाऊंडेशन आणि सेवासदन हॉस्पिटलचे  प्रेरणास्थान डॉ.मलगोंडा पाटील, अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील, डॉ.साक्षी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमृता दात्ये, सचिव श्री. योगेश पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा पाटील, हॉस्पिटल सल्लागार श्री. राघव, डॉ. रघुनाथ कुलकर्णी तसेच सेवासदन हॉस्पिटलची व्यवस्थापन टीम आणि हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते.  वृक्षारोपणसाठी श्री. गिरीश फाटक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मिनाक्षी कोळी यांनी केले.

Post a Comment

0 Comments