Daily Mahasatta

Daily Mahasatta

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

         सांगलीदि. 23,: भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष सन 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घेण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

            सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनांच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.

00000

Post a Comment

0 Comments