Daily Mahasatta

Daily Mahasatta

सफाई कर्मचारी बसला मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर

शिराळा (विनायक गायकवाड)

    एखाद्या कनिष्ट कर्मचाऱ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसण्याचा मान फक्त पदोन्नती झाली तरच मिळतो. मात्र शिराळा येथील सफाई कर्मचाऱ्यास  सेवानिवृत्ती निमित्त मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर बसण्याचे भाग्य लाभले. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्वतः च्या खुर्चीवर बसवून आरोग्य कर्मचारी यांना दिला सेवानिवृत्ती निमित्त निरोप दिला. यावेळी या कर्मचाऱ्यास अश्रू अनावर झाले होते.


   शिराळा नगरपंचायतीचे आरोग्य कर्मचारी अरूण बापू लोंढे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.  त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ  नगरपंचायत कार्यालयामध्ये  आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमांच्या वेळी नगराध्यक्षा सुनिता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी यांच्या हस्ते अरूण लोंढे व त्यांच्या पत्नी उषा  लोंढे यांना आहेर व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
     
यानंतर मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी भविष्य निर्वाह निधीचा धनादेश दिला. तोही  अरुण लोंढे यांना आपल्या खुर्चीवर बसवून नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच असा निरोप देण्यात आला. यावेळी लोंढे दाम्पत्य भावूक झाले होते. तसेच उपनगराध्यक्ष दळवी यांनी वैयक्तिक सत्कार करुन ठराविक रक्कम भेट म्हणून दिली. याप्रसंगी नगरपंचायत कर्मचारी सुभाष इंगवले, लक्ष्मण मलमे , तात्यासो कांबळे यांनी त्यांच्या कार्यकाळामधील अनुभव सांगितले सदरच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले.

यावेळी पाणीपुरवठा सभापती मोहन जिरंगे ,कार्यालयीन अधिक्षका सुविधा पाटील , नयना कुंभार, अर्चना गायकवाड, संजय इंगवले, प्रकाश शिंदे , आबाजी दिवाण , विजय शिंदे , सदानंद टिळे तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. शेवटी  अधिक्षक सुविधा पाटील यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments