Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीषण अपघात


विटा (प्रतिनिधी)
विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरचे चाक पायावरुन गेल्यामुळे पेड ता. तासगाव येथील  तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,
मायणी रस्त्यावरून खानापूरच्या दिशेने निघालेल्या दोन्ही गाड्यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भीषण अपघात झाला. या भीषण धडकेत तासगाव तालुक्यातील पेड येथील गोरख महादेव शेंडगे (वय ३५ वर्ष) व्यक्तीच्या दोन्ही पायावरून डंपर गेल्याने हा व्यक्ती गंभीर जखमी झाला . तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला आणखी एक जण किरकोळ जखमी झाला आहे. 

या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने जखमी शेंडगे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. यावेळी विट्यातील शिवाजी नगर येथील बिराप्पा संताप्पा बनसोडे या डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Post a Comment

0 Comments