Daily Mahasatta

Daily Mahasatta

दोन्ही डोस घेतलेल्यांना मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज

मुंबई (प्रतिनिधी)

कोव्हीड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्ट पासून मुंबई लोकलच्या प्रवासाला मुभा देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई लोकल आणि बार, रेस्टॉरंट, मॉल याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई शहरातील लोकल आता सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येत असून १५ ऑगस्टपासून ज्या नागरिकांचे लसीचे दोन  डोस घेऊन १४ दिवस पुर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन ॲप सुरू केले आहे. तसेच लोकल प्रवासासाठी मुंबई महानगरपालिकेतून देखील पाास देण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सर्व सामान्य लोकांना यानिमित्ताने स्वातंत्र्य दिनाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments