Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रतिक पाटील यांच्या पाठपुराव्याने भवानीनगर मधील रखडलेले रस्त्याचे काम मार्गी


वाळवा ( रहिम पठाण)
भवानीनगर ता.वाळवा येथील वाॕर्ड नं. ३ मधील रस्त्याचे काम बरेच दिवस रखडलेले होते. या भागातील रस्ता हा रहदारीचा आहे. शाळा, बँक व बाजारपेठेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर नागरीकांच्यातून  केला जातो. पण पावसाळा सुरु झाला की रस्त्याला डबक्याचे स्वरुप येत होते. यामुळे हा रस्ता दुरुस्त होणे गरजेचे होते. या विषयाची दखल घेऊन युवा नेते प्रतिक पाटील यांनी हे काम मार्गी लावले व डबक्याचे रुपांतर चांगल्या रस्त्यामध्ये झाले. यामुळे परीसरातून समाधान व्यक्त केले जात आहे. गावातील लोकांच्या या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल गावातील सामाजिक कामात अग्रेसर असणारे राहुल वाकळे यांनी दादांना भेटून त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments