Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात आठ दिवसात पाच ठिकाणी चोरी, पोलीसदादा नेमकं करतायत तरी काय ?


 कुपवाड (प्रमोद अथनिकर)  
कुपवाड मध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला असून गेल्या आठ दिवसांत कुपवाड परिसरात पाच ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार घडला आहे.  
   याबाबत अधिक माहिती अशी,  गेले आठ दिवसात अक्षरशः चोरट्यांनी धुमाकूळ घालून कुपवाड परिसरात पाच ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. पण या चोरी प्रकरणातील एक ही  चोरटा  सापडला नाही. त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
     आठ दिवसा च्या पाठीमागे कुपवाड परिसरातील लिंगायत गल्ली येथील घरफोडीचा प्रकार घडला होता. तसेच एका वृद्ध महिलेचे दोघे भामट्यांनी सोन्याची बांगडी चोरीचा प्रकारही घडला होता. दोन दिवसा पाठीमागे औद्योगिक वसाहतीमधील बेदाने  बॉक्स चोरीस गेल्याची घटना घडली आहे व काल रात्री कुपवाड मधील फर्निचर चे दुकान व किराणा दुकान हे अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानांमधील रोख रक्कम २२ हजार ५०० रुपये चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .
     चोर सापडले नसल्याने कुपवाड  मधील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्वतः लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments