Daily Mahasatta

Daily Mahasatta

आघाडीत बिघाडी ; मंत्री विश्‍वजित कदम यांनी पुन्हा नारळ फोडल्याने राजकीय खळबळ


कडेगाव,  (सचिन मोहिते)
महाराष्ट्रात महाविकास आघाडिमध्ये बिघाडी असल्याचे चित्र जनतेस पहावयास मिळत आहे. कारण प्रत्येक पक्षातील  नेते एकमेकांवर टीका करत आहेत. तसेच काहीसे चित्र कडेगाव पलूस मतदार संघात दिसत आहे. कारण राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उद्घाटन झालेल्या ठिकाणीच पूनश्च उद्घाटनाचा नारळ फोडला असल्याने तालुक्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
 
   माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका सौ.निता देसाई यांनी त्यांच्या प्रभाग क्र.१२ मध्ये १८ऑगस्ट रोजी विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व त्या प्रभागातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते केलेले होते. त्याच प्रभागामध्ये मंत्री विश्वजीत कदम यांचे शुभहस्ते त्या प्रभागाच्या नगरसेविकेला डावलून त्याच विकास कामांचा नारळ फूटल्याने कडेगाव - पलूस मतदार संघात महाविकास आघाडी नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत .

  कडेगाव नगरपंचायतीवर सध्या काँग्रेसची एकहाती निर्वाचित सत्ता आहे. गेली साडे चार वर्षे सत्ता असून कडेगाव शहराचा पाहिजे असा कोणताच विकास झालेला नाही. त्यामुळे राज्यमंत्र्यांची राजधानी ही फक्त नावापुरतीच आहे, असे सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकना वाटू लागले आहे. तसे सुचक वक्तव्य  भाजपाचे सांगली जिल्हाअध्यक्ष. माजी आमदार पृथ्वीराज(बाबा) देशमुख यांनी केले होते .
शहारातील नागरिकांना फक्त मतदान करे पर्यंत खोटी आश्वासने द्यावयाची आणि निवडणूक झाली की मनमानी हे गाव पुढारी करत असतात व स्वतःची राजवट चालवण्याचा प्रकार करत असतात. हा सर्व प्रकार शहराच्या प्रगतिवर गतिरोधकाचे कार्यकरत आहे.या मध्ये जर सुधारणा नाहीं झाली व हे श्रेयवादाचे राजकारण नाही शमले तर कडेगाव शहरातील सुज्ञ व ज्येष्ठमतदार लोकशाहीच्या मार्गाने बदलाच्या मार्गावर शिक्कामोर्तब करतील अशीचिन्हे आता दिसू लागली आहेत.
-----------------------------------------
कोनशिलेवरील नाव 
खोडल्याने खळबळ..
मंत्री विश्वजीत कदम यांनी उद्घाटन केलेल्या कोणशिले वरील पैलवान वैभव देसाई यांचे नाव खोडलेचे दिसुन  येत आहे यामुळे तालुक्यात नाव का खोडले असावे हा प्रश्न पडला असून एकच खळबळ उडालेली आहे . हे नाव नक्की कोणी व का खोडले असावे याची उत्सुकता तालुक्यातील जनतेत शिगेला पोहचली आहे.
       तर एखाद्याचे नाव खोडल्याने त्या व्यक्तीचा इतिहास नष्ट होत नाही .काँग्रेसच्या नेत्यांनी जो प्रकार केला तो त्यांना व मंत्री विश्वजीत कदम यांना अशोभनिय असुन त्यांना या कार्यक्रमास शंभर माणसे जमवता आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी सुडाचे राजकारण कोणाच्या विरोधात करावे हे समजून घेणे गरजेचे आहे .

Post a Comment

0 Comments