Daily Mahasatta

Daily Mahasatta

औद्योगिक महामंडळाने केलेली ४० टक्के बांधकामाची सक्ती रद्द करावी : सतिश मालू.

कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने औद्योगिक महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना अध्यक्ष सतिश मालू.

कुपवाड (प्रमोद अथनिकर)
गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील औद्योगिक क्षेत्रात मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत उद्योजकांना रिकाम्या भूखंडावर किमान ४० टक्के बांधकामाची केलेली अन्यायी सक्ती तातडीने रद्द करावी अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अॅन्ड कॉमर्सचे अध्यक्ष सतिश मालू यांनी औद्योगिक महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनद्वारे केली आहे.
     
  मागणीचे निवेदन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तसचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अभियंता यांनाही पाठविले आहे. औद्योगिक महामंडाने उद्योजकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच हा नियम असाच उद्योजकांवर लादण्याचा निर्णय कायम ठेवल्यास सनदशीर कायदेशीर मार्गाने आम्हास दाद मागण्याशिवाय पर्याय नाही.
      भूखंडधारकांना यातून पूर्णपणे सूट द्यावी म्हणजे आपण लघु उद्योजकांच्या पाठीशी रहावे. आपल्या परिपत्रकाप्रमाणे ४० टक्के बांधकाम पूर्णत्वाविषयी कळविले आहे. परंतु मंदीच्या व कोरोना महामारीच्या काळात उद्योजकांवर फार मोठा परिणाम झाला आहे. तसेच आपण नॉन युटिलायझेश चार्जेस लावल्यास महाराष्ट्रातील  अनेक एम. आय. डी. सी. मधील उद्योग बंद होणार आहेत. लघु उद्योजकांना आता गुंतवणूक करण्यासारखी परिस्थिती नाही.
     तरी उद्योजकांना मंदीच्या काळात अन्यायी नॉन युटिलायझेश चार्जेस ची सक्ती रद्द करावी असे निवेदन दिले. यावेळी संस्थेचे व्हा.  जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडु एरडोले संचालक रमेश आरवाडे, हरिभाऊ गुरव, दिपक मर्दा, बाळासाहेब पाटील, अरूण भगत, नितीश शहा हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments