Daily Mahasatta

Daily Mahasatta

हुतात्मा सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम रोलर पूजन कार्यक्रम संपन्न

वाळवा  (रहिम पठाण)

- पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

केंद्र शासनाने साखरेचे एम. एस. पी. प्रति क्विंटल रु.३६००/- जाहिर केल्याशिवाय साखर उद्योग सावरु शकत नाही : मा. वैभव काका नायकवडी

यावेळी बोलताना मा. वैभव काका नायकवडी म्हणाले, भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना कृषी प्रधान देशातील शेतकरी, कामगार त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असणारा साखर उद्योग मोठ्या अडचणीत आहे. या उद्योगावर शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूक, मुकादम व कामगार त्याच बरोबर साखर उद्योगातील व्यापारी, छोटे मोठे उद्योजक या सर्व घटकांची रोजी रोटी साखर उद्योगावर अवलंबून आहे. नैसर्गिक, कोरोना साथीमुळे ऊस बिलाची एफ. आर. पी., कामगारांचे पगार, ऊस उत्पादन खर्च यासाठी बँकांची कर्जे व त्यावरील व्याज यामुळे आर्थिक अडचणीत हा उद्योग दिवसेदिवस अडचणीत सापडला आहे. यासाठी केंद्र शासनाने साखरेचे प्रति क्विंटल रु.३६००/- जाहिर केल्याशिवाय हा उद्योग टिकणार नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी हुतात्मा किसन अहिरांचे औद्योगिक स्मारक म्हणून आपल्या कारखान्याची उभारणी केली. अशा या क्रांतिकारक कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ चा रोलर पूजन आपल्या सर्वांचे हस्ते संपन्न झाला. गत हंगामामध्ये कोरोनाच्या साथीमुळे अपेक्षित ऊस गाळप करु शकलो नाही. या वर्षी ७ लाख मेट्रीक टन ऊस गाळप व सरासरी १३.५० टक्के रिकव्हरीने १० लाख साखर पोती उत्पादन करणेचे उदिष्ट ठेवून येणारा गळीत हंगाम चांगल्या पध्दतीने यशस्वी करु या. यासाठी कारखान्यातील कर्मचा-यांनी इथेनॉल व साखर कारखाना ऑफ सिझनमधील ओव्हरहॉलिंगची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच सर्व शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांनी जी जबाबदारी पडेल ती प्रामाणिकपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला.

साखर उद्योगामध्ये "हुतात्मा पॅटर्न" निर्माण करुन डॉ. नागनाथअण्णांनी अडचणीच्या काळात सुध्दा मार्ग दाखविण्याचे काम केले आहे. ती जबाबदारी आपल्या सर्वाच्या साथीने पार पाडावी लागेल असे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. बाबुराव बोरगांवकर व सर्व संचालक, हुतात्मा दूध संघाचे व्हा.चेअरमन श्री. भगवानराव पाटील व त्यांचे सर्व सहकारी, हुतात्मा बझारचे चेअरमन श्री. दिनकर बाबर व त्यांचे सर्व सहकारी, हुतात्मा बँकेचे चेअरमन श्री. किरणदादा नायकवडी व त्यांचे सर्व सहकारी, हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, माजी संचालक श्री.सावकर कदम, श्री. यशवंत बाबर, श्री. दिलीप पाटील, श्री. बबन हवलदर, श्री. भगवानराव अडिसरे, श्री. नंदू पाटील पैलवान, श्री. राजेंद्र साळुंखे, श्री. अि वाजे, श्री. आनंदराव शिंदे सर, श्री. जयकर चव्हाण, श्री. बाळासाहेब पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. धिरजकुमार माने, अधिकारी व त्यांचा सर्व स्टाफ हजर होता.

Post a Comment

0 Comments