Daily Mahasatta

Daily Mahasatta

लाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ


इस्लामपूर ( हैबत पाटील)
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाधानी राहिलेला माळकरी , प्रांजळ,निर्मळ, भोळ्या मनाच्या नंदूच आज दुःखद निधन झालं. इस्लामपूरच्या चौका चौकात बिनधास्तपणे वावरणाऱ्या नंदूची एक्झिट ही हृदयविकाराने जरी झाली असली, तरी तो इस्लामपूरकरांच्या हृदयात कायमची जागा निर्माण करून गेलाय.

नंदूचा जन्म येथिल यल्लमा चौकात बुरुड गल्लीतला. शरीराने बलदंड विजार ,शर्ट घातलेला नंदू रंगाने सावळा होता पण त्याच्या मनातला भाव हा पंढरीच्या विठ्ठला इतका प्रांजळ,प्रेमळ होता .गांधी चौक असो वा यल्लमा चौक, अथवा स्टँड रोड परिसर नंदू हमखास भेटायचा. कोणी त्याची मस्करी केली तरी तो क्षणभर चिडायचा. पण पुन्हा आपल्या विश्वात मश्गुल असायचा.  इस्लामपूरच्या चौका चौकात फिरताना तो दिसायचा. दिसायला राकट, रागीट, पहिल्यांदा पाहताना कोणाला ही भीती वाटावी असा नंदू मनाने भोळा होता. शहरात चहा टपरीवर वडा पाव चहा हक्काने मागायचा आणि लोक पण त्याला प्रेमाने द्यायचे . स्त्रियांच्या बद्दल नितांत आदर असणारा नंदू कोणत्या ही स्त्री ला ताई,आक्का, काके, मावशे, अशीच हाक मारताना दिसायचा शरीराने बलदंड असला तरी मनाने  मलूल होता.

इस्लामपूर शहरवासीयांचा तो आपला माणूस वाटत होता. इस्लामपुरात येणारी स्वामी समर्थ पालखी असो वा आषाढी एकादशी ला शिराळा तालुक्यातून पंढरपूर ला  पायी जाणाऱ्या दिंड्या असो नंदू  खांद्यावर भगवी पथाका घेऊन सगळ्यात पुढं असायचा. प्रत्येक नवख्या माणसाला भेटल्यावर माझी माळ आहे असं म्हणून गळ्यातली पंढरीची माळ दाखवायचा.
आख्खं इस्लामपूर त्याच्यासाठी एक कुटुंब झालं होतं. गणेश मंडळाची मिरवणूक असो की   मंडळाची आरती नंदू हजर असणार अन्य कारणास्तव निघणारी कोणतीही मिरवणूक असली तरी नंदू त्यात दिसणारच. नंदुचा इस्लामपूरच्या कानाकोपऱ्यात वावर असायचा.या दोन वर्षात नंदूच फिरणं कमी झालं होतं. त्याला हृदय विकाराचा त्रास चालू होता.आज सकाळी त्याला त्रास झाला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली . रस्त्याने येता जाता ओळखीचा असो वा नसो आदराने हाक मारणारा नंदू, सावळ्या विठ्ठलावर नितांत श्रद्धा असणारा नंदू, खांद्यावर भगवी पथाका घेऊन बलभीमा सारखा भासणारा नंदू , शहरात दिमाखात वावरणारा नंदू अत्ता दिसणार नाही  अश्या नंदुची एक्झिट इस्लामपूर वासीयांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
     अशा या अबालवृद्धांच्या लाडक्या नंदूला दैनिक महासत्ता परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

must read..

Post a Comment

1 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete