Daily Mahasatta

Daily Mahasatta

अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक गेल ऑम्वेट यांच निधन, वाचा सविस्तर कोण होत्या गेल ऑम्वेट


इस्लामपूर(प्रतिनिधी)

क्रांतिवीरांना इंदूताई पाटणकर यांच्या स्नुषा व भारत पाटणकर यांच्या पत्नी गेल ऑम्वेट यांचं निधन झाले .आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, भारतीय समाज, जातीव्यवस्था, इथले लोकजीवन, मौखिक परंपरा, संत साहित्याच्या गाढया अभ्यासक, स्त्री वादाची नवी मांडणी करीत ग्रामीण स्त्रियांचे  शोषण केंद्रस्थानी आणणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या,  फुले आंबेडकर तत्वज्ञान त्याच्या समर्थ्यासह पुन्हा नव्याने अधोरेखित करणाऱ्या गेल ऑम्वेट यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी  वृद्धापकाळाने  आज दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार दि २६ रोजी कासेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ऑम्वेट अमेरिकेत जन्मलेल्या एक भारतीय विद्वान, समाजशास्त्रज्ञ अभ्यासक आणि संशोधक आहेत. त्यांचा जन्म 02 ऑगस्ट 1941 रोजी अमेरिका मधील मिनियापोलिसमध्ये येथे झालेला असून, अमेरिकेतील कार्लेटन कॉलेज आणि यूसी बर्कले येथे त्यांनी  शिक्षण घेतले. आणि अमेरिके मध्येच त्यांनी 1973 मध्ये "समाजशास्त्र" या विषयावर "पी.एच.डी." केली . जवळपास 1983 पासून त्या भारतीय नागरिक आहेत. सध्या त्या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील "कासेगाव"  गावात आपले पती डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल यांच्या समवेत राहत असत. त्या क्रांतिवीर बाबूजी पाटणकर आणि क्रांतीविरांगणा इंदूताई पाटणकर यांच्या सून आहेत. त्यांना प्राची पाटणकर नावाची एक मुलगी असून, ती मुलगी सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. भारतात त्यांनी जातीविरोधी चळवळ, दलित राजकारण आणि भारतातील महिलांच्या संघर्षांवर असंख्य लढे, जनचळवळी उभ्या केलेल्या असून, त्यांची या लढ्यावर असंख्य पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गेल ऑम्वेट यांच्या लिखाणात वर्ग, जात आणि लिंग समस्यांवर असंख्य पुस्तके आणि लेख समाविष्ट आहेत.  अनेक संशोधन प्रकल्प हाती घेण्याव्यतिरिक्त, डॉ. गेल ऑम्वेट ह्या FAO, UNDP आणि NOVIB च्या सल्लागारही आहेत. आणि त्यांनी ओरिसातील NISWASS मध्ये डॉ आंबेडकर चेअर प्रोफेसर, पुणे विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि नॉर्डिक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज, कोपेनहेगन तसेच त्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीच्या वरिष्ठ सहकारी होत्या आणि क्रांतिवीर ट्रस्टच्या संशोधन संचालकही आहेत. तसेच त्या इतर अनेक संस्थांसाठी पर्यायी विकास निती, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या विषयांवर सल्लागार समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत होत्या.  डॉ.भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल, यांच्या सोबतश्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या समन्यायी पाणी वाटप, धरणग्रस्त, सांस्कृतिक , पर्यायी विकास नीती सह जवळपास सर्वच चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा आणि परितक्त्या महिला चळवळीतील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील त्यांचं काम उल्लेखनीय अस आहे. गेल ऑम्वेट यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य आणि संशोधनामुळे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने  त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments