Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठकरांच्यासाठी खुशखबर ! आजचा मंगळवार ठरला सुपर मंगळवार


पेठ (रियाज मुल्ला);
गेल्या काही महिन्या पासून पेठेत रोजच कोरोना रुग्ण सापडत होते त्याला आजचा दिवस मात्र अपवाद ठरल्याने कोरोना रुग्णाच्या दृष्टीने आजचा मंगळवार सुपर मंगळवार असून ही पेठककरांच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.
    गेल्या काही महिन्यापासून वाळवा तालुका हा सांगली जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरला होता. रोज किमान 150 च्या वर रुग्ण रोज सापडत होते .त्यात पेठ गावातील  कोरोना रुग्णांची संख्या किमान 10 च्या आसपास रोज होती.
  पेठ ग्रामपंचायतीने रुग्ण संख्या आटोक्यात येण्यासाठी गत महिन्यात गाव बंद पुकारला होता त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तसेच लसीकरणासाठी पाठपुरावा करून पेठ येथील मराठी मुलांची शाळा क्रमांक १ याठिकाणी लसीकरण ची सोय करून लसीकरण चा वेग वाढवला आहे. यासाठी  पेठ आरोग्य केंद्राच्या अधिकारी,आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांचे लसीकरण साठी मोलाचे योगदान लाभत आहे.
    मागील आठवड्यात  रोज नगण्य प्रमाणात रुग्ण संख्या होती. आज वाळवे तालुक्याची एकूण 52 रुग्णसंख्या आहे.मात्र आज  मंगळवारी एकही रुग्ण पेठेत सापडला नसल्याने पेठकरांच्या साठी ही दिलासा देणारी बाब असून आजचा मंगळवार हा सुपर मंगळवार ठरला आहे.

Post a Comment

0 Comments