Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर व शिराळ्यात आज सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन


इस्लामपूर( प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे  यांना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज इस्लामपूर व शिराळा  येथे महाडिक समर्थक भाजपा व रयत क्रांती संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सतीश महाडिक दादा, माजी नगरसेवक कपिल ओसवाल,नगरसेवक अमित ओसवाल, युवा नेते सागर खोत,नगरसेवक चेतन शिंदे, नगरसेवक केदार नलवडे,भाजपा विद्यार्थी वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर, रयत क्रांती अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहसीन पटवेगार, मन्सूर मोमीन,जलाल मुल्ला,सत्यवान रासकर, प्राध्यापक दत्तात्रय पाटील,यश माळी,अमोल ठाणेकर,सागर जाधव,अजित पाटील  रामभाऊ जाधव,विकास रोकडे,राहुल खबाले,रोहित देसाई, हारून शेख,सचिन दिवटे, सौरभ नलावडे,भूषण पाटील, वैभव इंगवले, अभिनव नलावडे, अशोक पाटील,संग्राम पाटील, अय्याज नायकवडी, प्रतीक हसबनिस, मोसीन नालबंद,अक्षय माळी,अभिजित नलावडे,अक्षय पवार,बाजीराव नलावडे, अशोक सवाईराम, अजित कुंभार,अमित माने यांच्यासह इतर महाडिक युवा शक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments