Daily Mahasatta

Daily Mahasatta

भाजप सरकार प्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा : आमदार सुधीर गाडगीळ

सांगली  (प्रतिनिधी)

: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सन २०१९ ला पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त नागरिक व व्यापारी यांच्यासाठी जशी भरघोस मदत केली होती, तशीच मदत यंदाही महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली.

राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या पकेज मधून संकटग्रस्तांच्या वाट्याला फार कमी मदत येणार आहे. या सरकारने जाहीर केलेल्या मदती मधील सात हजार कोटी रुपये दीर्घकालीन उपाययोजना , तर तीन हजार कोटी रुपये पुनर्बांधणी व पुनवर्सनासाठी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची उपाययोजनारुपी मदत मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या या संकटग्रस्तांना तातडीने रोख मदतीची गरज आहे.

तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पूरग्रस्त जनतेसाठी जो शासन आदेश काढला होता, त्यानुसार मदत देणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र या मदतीत कपात केल्याचेच दिसते आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केले होते. मात्र या मदतीत कपात केल्याचेच दिसते आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना घरो घरी जाऊन मदत पोहचवली होती, तर संकटग्रस्तांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते.
अतिवृष्टी व पुरामुळे ज्यांची घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती. अशा नागरिकांना शहरी भागात ३६ हजार रुपये, तर ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली होती, अशांना ९५ हजार १०० रुपये धनादेशा आधारे दिले होते. अशी भरघोस मदत महाविकास आघाडी सरकारने द्यावी. देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकर्यांना दिलेल्या मदती पेक्षा हि कमी मदत या सरकारने दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या मोठ्या आकड्यांचे ढोल आता वाजविण्याएवजी थेट मदत पोहोचविण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणीही सुधीर गाडगीळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments