Daily Mahasatta

Daily Mahasatta

कवठेमंकाळात संभाजी भिडे गुरुजी यांच्या मुख्य उपस्थितीत अनोखा गृह प्रवेश सोहळा संपन्न


कवठेमहांकाळ, (अभिषेक साळुंखे)
अनिष्ट , रुढी आणि परंपरेला फाटा देत सखल संत , शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विज्ञानवादी विचारांना प्रेरीत मानुन शिवश्री हिम्मंत साळुंखे व पत्नी सविता साळुंखे यांनी आज रोजी नवीन घरात अनोख्या पद्धतीने गृहप्रवेश केला. शिवप्रतिष्ठानचे सस्थापंक सभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत  ढालेवाडी ता. कवठे महंकाळ जि. सांगली  येथे  हा घर प्रवेश सोहळा पार पडला.शिवधर्म ठरावा विश्वधर्म अन घोष करावा जय जिजाऊ जय शिवराय ही घोषणा देऊन हा सोहळा पार पडला .
     यावेळी माजी उपसरपंच हिम्मत साळुखे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष हणमंत साळुंखे, रमेश चव्हाण,बेदाणा व्यापारी वासुदेव जाधव, दत्त कन्ट्रक्शनचे मालक मनोज देसाई, ढालगावचे सरपंच देसाई ,मेजर अमोल साळुंखे, सजयं चव्हाण, अशोक शिंदे, अनिल बाबर , नितीन खोळपे आणि गावातील पुरुष महिला याच्या उपस्थित घर प्रवेश सोहळा पार पडला.

Post a Comment

0 Comments