Daily Mahasatta

Daily Mahasatta

अपहरण झालेल्या बालकाचा खून झाल्याचे उघडकीस


बिद्री (प्रतिनिधी)
: कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा खून झाल्याचे आज उघड झाले. त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे त्याचा मृतदेह आज सापडला. संशयित म्हणून मुलाच्या वडिलांचाच मित्र दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य ( वय ४५, रा. सोनाळी ) याला या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही गावांत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
                 याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली माहिती अशी,सोनाळी ( ता. कागल ) येथील वरद रविंद्र पाटील हा सातवर्षीय बालक मंगळवारी सायंकाळी आजोळी सावर्डे बुद्रुक येथे कुटूंबियांसह गेला होता.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेलेला वरद घरी परत न आल्याने नातेवाईंकाकडून परिसरात त्याचा शोध घेतला. परंतू तो न सापडल्याने त्याच्या पालकांनी अज्ञात इसमाविरोधात मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली होती.
                   मागील दोन दिवसांपासून पोलिस आणि नातेवाईक वरदचा शोध घेत होते. आज सकाळी सावर्डेतील लक्ष्मीनगर शेजारील शेतवडीत त्याचा मृतदेह आढळला. वरदचा मृतदेह सापडल्याची माहिती समजताच सोनाळी व सावर्डे येथील ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही गावांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
                       मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला.

Post a Comment

0 Comments