Daily Mahasatta

Daily Mahasatta

पूरग्रस्तांना दोन हजार लिटर खाद्यतेलाची मदत

सांगली : (प्रतिनिधी)
 नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे फटका बसलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत देण्यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी यांनी द.भा.जैन सभेला आवाहन केले होते. त्यानुसार दक्षिण भारत जैन सभेने समाजाला आवाहन करुन जमा झालेल्या देणगीतून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे खाद्यतेल सुपूर्द करण्यात आले. प्रत्येकी एक लीटरच्या एकूण 2000 खाद्यतेलाच्या पिशव्या मदत म्हणून देण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी मा.सौ.मोसमी बर्डे  व अतिरिक्त जिल्हा धान्यपुरवठा अधिकारी सौ. शिल्पा ओसवाल यांनी ही मदत स्वीकारली. 

यावेळी  सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष सर्वश्री भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि. पाटील, मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील, विभागीय ट्रस्टी पोपटलाल डोर्ले, लठ्ठे एज्यु.सोसायटीचे सदस्य अभय पाटील, बोर्डिंग सदस्य प्रशांत अवधूत आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर मदतीसाठी समाजातील विविध संस्था व व्यक्तिंनी आर्थिक सहयोग दिला. रावसाहेब आ. पाटील (दादा), कर्मवीर पतसंस्था सांगली (प्रत्येकी रु.51 हजार), वीराचार्य पतसंस्था, सांगली, शांतिसागर क्रेडिट सोसायटी, समडोळी, भालचंद्र वि.पाटील, स्वदेशी ट्रस्ट, डॉ. आण्णासोा एस.चोपडे (प्रत्येकी रु.21 हजार), प्रशांत पाटील (मजलेकर), प्रा.ए.ए.मुडलगी, प्रशांत अवधूत, सागर वडगावे, सुदर्शन हेरले, अभय पाटील, गिरीश जंबू मगदूम (न्यू जर्सी-युएसए), मंजुनाथ शेटे (आरग) (प्रत्येकी रु.11 हजार) तर जयपाल चिंचवाडे, डॉ.अजित पाटील, पोपटलाल डोर्ले,  आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, रविंद्र माणगावे, मिलींद चौधरी, अविनाश पाटील, राजगोंडा पाटील (गुमट), केतन ठिगळे, गुंडूराव आ.खोत, प्रा.एस.डी.आकोळे (प्रत्येकी रु.5 हजार) अशी देणगी दिली आहे. सौ. मौसमी बर्डे यांनी सभेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून मदतीबद्दल धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments