Daily Mahasatta

Daily Mahasatta

खंडेराव जाधव यांनी कुवत पाहून बोलावे : वैभव पवार

 इस्लामपुर  (हैबत पाटील)

स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याची स्व. एम. डी. पवार यांच्यावर बोलण्याची योग्यता नाही. आपली कुवत तपासून वक्तव्य करा अन्यथा  जर अंगात फारच खूप खुमी असेल तर जयंत पाटलांचा वरदहस्त जरा बाजूला ठेऊन  इस्लामपुरात येत्या निवडणुकीला  पक्ष विरहित  माझ्याशी कोणत्याही वॉर्डात निवडणूक लढवून दाखवावी. लवकरच आम्ही आपल्या गैर कृत्याची पाळेमुळे बाहेर काढणार आहे, असे आव्हान व खणखणीत इशारा  खंडेराव जाधव यांना विकास आघाडीचे उपाध्यक्ष व उरूण-इस्लामपुर नगरपरिषदेचे नगरसेवक वैभव पवार यांनी दिला .

नगरसेवक खंडेराव जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावर आज पवार यांनी पलटवार केला. एम. डी. पवार बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी बोलताना वैभव पवार पुढे म्हणाले,स्व. एम.डी. पवार यांनी सलग २७ वर्षे या शहराचे नगराध्यक्ष पद भुषवले आहे. त्यांचे शहरातील नागरिकांशी कुटुंबप्रमुख म्हणुन नाते होते. शहरातील नागरीकांना न्याय देण्याचे काम करते. वेळ प्रसंगी पदरमोड करून शहरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हसु फुलवले. अन्यायाचे व कुटनितीचे राजकारण मोडीत काढण्यासाठी सदैव संघर्ष केला. हाच विचार व वारसा घेउन मी व आमचे  कुटुंब शहरामध्ये राजकारण करत आहे. महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावुन जाणाऱ्या, शहरात दहशत माजवुन दरारा निर्माण करणाऱ्या आणि जयंत पाटील यांच्या टेरर गॅगमधील मोहरक्याने स्वत:च्या कुटुंबाचा असणारा वारसा तपासावा, आपला प्रपंचा कोणत्या उत्पादनावर चालतो हे शहरवासीयांना चांगले माहिती आहे, खडेराव जाधव यांची प्रतिमा खुनशी, गुंड वृत्तीची असल्याचे सांगण्याची कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. स्व. एम.डी. पवार  यांच्यावर आरोप करण्यासारखी खंडेराव जाधव उंची नाही. खंडेराव जाधव हे  पूर्णतः बदनामा झालेले व्यक्तिमत्व आहे.  जाधव यांच्या कुटुंबाला कोणताच राज राजकारण, समाजकारणाचा वारसा नाही याची  सर्वांना माहिती आहे. त्यांची असलेली संपत्ती ही नेमक्या कोणत्या कष्टाच्या जोरावर उभा राहिली याचे उत्तरही शहरातील जनतेला  त्यांना देता येणार नाही आजपर्यंत जाधव यांनी  दहशतीच्या बळावर शहरातील अनेक जागा लाटल्या आहेत. आलिशान असा टोलेजंग बंगला उभारला,  आलिशान गाड्याची हौस पुर्ण करत यासाठी लागणारा पैसा हा कष्टाच्या कामातून उभा राहिला का?
दहशतीतुन निर्माण इाला याची सर्व माहिती शहरातील जनतेला आहे . यामुळे  एम. डी. पवार साहेब यांच्या कुटुंबावर आरोप करून स्वत:ची बदनाम  झालेली प्रतिमा सोज्वळ करण्याचा प्रयत्न करत आहात हे धंदे बंद करा
आरक्षणाचे भुत दाखवुन शहरातील जनतेचे भुखंड हडपणारी टोळी म्हणूनच  आपण कु परिचीत आहात.
आमची नाळ शहरातील सर्वसामान्यांशी जोडली आहे त्यांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही सतत संघर्ष करत आलो. राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही कधी कुटुंबातील महिला पुढे  करून विरोधकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही आमची लहाई स्वाभिमानाने व विचाराने
लढली व यापुढेही स्वाभिमानाने व विचाराने लढली जाईल. स्व. पवार साहेबांच्या कुटुंबावर चुकिचे आरोप करून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न खंडेराव जाधव यांनी करू नये इथून पुढे जर आपण आमच्या कुटुंबावर आरोप केले  तर शहरातील अनेक प्रलंबीत गुन्हयांचा शोध घेण्यापासुन आम्ही सुरूवात करू, मोका सारखेही गुन्हे कमी पडतील इतके आपले कारनामे आहेत हे आम्ही व शहरातील जनता आजही विसरलेलो नाही. सभागृहातील कारभार लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांनी सर्वाना विश्वासात घेवुन कायद्याच्या मार्गदर्शनानुसार चालविला आहे. आपल्या सत्ता काळात सभागृहातील कामकाज कशा पध्दतीने केले हे ३१ वर्षातील नगरपलिका प्रशासनाच्या दप्तरातुन दिसुन येत आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाला
आपल्याच हुकुमशाही कारभाराला चपराक देणारा आहे. जनतेने सत्ता दिली म्हणजे  नगरपालिका ही स्वत:ची प्रॉपर्टी आहे असे समजुन आपण केलेला कारभार हा शहरातील जनतेला अंधारात ठेवुन हुकुमशाहीचे दर्शन घडविणार आहे.आपल्या सारखी गुंड वृत्तीचे लोक महिला आधिका-यांच्या अंगावर खुर्ची घेवुन धावुन जात असतील तर कशाला आधिकारी इस्लामपूर मध्ये येतील यावर आपल्या सारख्या गुंडाने बोलणे व आरोप करणे हे  न शोभणारे आहे. यापुढे आपली प्रतिमा, उंची, विचार, वृत्ती, संस्कृती तपासुन विरोधकांच्यावर आरोप करा ते पुढे म्हणाले जनमत शून्य असणारे व्यक्तिमत्व म्हणजे खंडेराव जाधव आहे. इथून पुढच्या काळात पवार कुटुंबावर बोलाल तर याद राखा असा इशारा वैभव पवार यांनी दिला.

Post a Comment

0 Comments