Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुर्ली गावच्या सरपंच पदी सौ. जयंती संदीप जाधव यांची निवड


विटा (प्रतिनिधी)
खानापूर तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सौ. जयंती संदीप जाधव यांची बहुमताने सरपंच पदी निवड झाली. या निवडीनंतर माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव (दादा) पाटील यांनी नूतन सरपंच सौ जयंती जाधव यांचा सत्कार केला.

     कुर्ली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच कै. दादासाहेब पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सतीश साळुंखे यांनी काम पाहिले. सरपंच पदाच्या या निवडणुकीत माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाच्या सौ जयंती संदीप जाधव यांनी ६ विरुद्ध ३ अशा फरकाने विजय मिळवत बाजी मारली.
        नूतन सरपंच जयंती जाधव यांचा माजी आमदार मा. सदाशिवराव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष , वैभव दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सरपंच सौ. जयंती जाधव म्हणाल्या, माजी सरपंच कै. दादासाहेब पाटील यांनी कुर्ली गावात विकासाचे नवे पर्व सुरू केले. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात गावचा सर्वांगीण विकास करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे मत सरपंच सौ. जाधव यांनी व्यक्त केले.

    यावेळी उपसरपंच ज्योती घाडगे, सुनील साळुंखे, सुरज कांबळे, दाजीराम घाडगे, सोनाली मंडले, अजय शेठ शिंदे, प्रशांत शिंदे, सुरेश पिसाळ, समाधान पाटील, नामदेव शिंदे, पोपट शिंदे, शंकर शिंदे, त्रिंबक यादव, दीपक पिसाळ, विठ्ठल सुतार, शंकर मंडले, बळवंत पिसाळ, तुकाराम घाडगे, इलाही शिकलगार अरुण कांबळे, तुषार साळुंखे, सचिन जाधव आणि संदीप जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
    

Post a Comment

0 Comments