Daily Mahasatta

Daily Mahasatta

महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नंदकुमार कुंभार यांची निवडइस्लामपूर / प्रतिनिधी :
  महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी सांगली कुंभार समाजाचे अध्यक्ष नंदकुमार सर्जेराव कुंभार यांची निवड करण्यात झाली आहे. या निवडीचे पत्र के सी वेणूगोपाल यांनी दिले. ऑल इंडिया काँग्रेस ची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष, महासचिव, जनरल सेक्रेटरी, प्रवक्ते यासह अनेक नवे पदाधिकारी यांच्या निवडी  कमिटीत जाहीर करण्यात आले आहेत. जनरल सेक्रेटरी यादीत  नंदकुमार सर्जेराव कुंभार यांची निवड होताच कुंभार समाजातील बांधवांनी जल्लोष केला.

   नंदकुमार कुंभार यांना राजकीय वारसा हा  आजोबा इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक स्व. पांडुरंग कुंभार यांच्याकडून मिळाला आहे. कुंभार समाजाच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नंदकुमार कुंभार हे नेहमी अग्रेसर आहेत. त्यांनी मातीवरील रॉयल्टी कुंभार समाजासाठी माफ होणेसाठी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत.कुंभार समाजातील मुलांना ओ बी सी  आरक्षण चा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. खादी ग्रामोद्योग  संघाचे अध्यक्ष असताना संघामार्फत समाजातील छोट्या व्यावसायिकांना बिनव्याजी अर्थपुरवठा केला आहे.

कुंभार यांच्या निवडीने कुंभार समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments