Daily Mahasatta

Daily Mahasatta

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या


पुणे (प्रतिनिधी )
सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे येथील शिवाजी नगर - गोखलेनगर परिसरात रविवारी सायंकाळी घडली आहे. निखील धोत्रे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी निखील धोत्रे हा कुटुंबीयांसमवेत शिवाजीनगर गोखलेनगर येथील सुगम चाळीमध्ये वास्तव्यास होता. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येपूर्वी त्यांने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने आईला उद्देशून म्हटले आहे, " आई तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला संभाळ. त्याची काळजी घे, असे चिठ्ठी मध्ये लिहिले आहे. तसेच मी सासरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करीत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांने चिठ्ठीतून केली आहे. 


 

Post a Comment

0 Comments