Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली बाजार समितीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


सांगली (प्रतिनिधी)
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली मध्ये ७५ वा भारतीय स्वातंत्रय दिनाचा कार्यक्रम मुख्य कार्यालयात सभापती श्री दिनकर पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला. 

बाजार समितीचे संचालक श्री कुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्व. पद्मभूषण वसंतरावदादा पाटील उद्यानामध्ये स्व. वसंतरावदादा पाटील  व स्व. विष्णु आण्णा पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करणेत आला.

सदर कार्यक्रमाला बाजार समितीचे सचिव श्री महेश चव्हाण डे सचिव श्री आर ए पाटील, व सहा सचिव एन वाय देसाई, व्यापारी, हमाल तोलाईदार, व बाजार समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments