Daily Mahasatta

Daily Mahasatta

अकरावीची प्रवेश परीक्षा रद्द, राज्य सरकारला मोठा धक्का

मुंबई, : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी  (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी  न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला होता यामुळे ११ वी प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य करण्यात आली होती. राज्यातील ३६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र उच्च न्यायालयाने अकरावी ची सीईटी परीक्षा रद्द करत दहावीला मिळालेल्या गुणांवर प्रवेश निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments