Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्मवीर पतसंस्थेच्या विविध शाखांचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा

सांगली (प्रतिनिधी)
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली च्या महावीरनगर, मालगांव व रामानंदनगर शाखेचा पहिला वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सभासद ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी दिली.

संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सभासदांना चांगली सेवा देणे, त्यांची प्रगती करणे यासाठी संस्थेने एक रोडमॅप समोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
महावीरनगर सांगली शाखेने एक वर्षात रु ४ कोटी ५८ लाख ठेवी गोळा केल्या असून कर्जे २ कोटी ६ लाख इतके वाटप केले आहे. चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी शाखेच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच येथील सभासदांनी शाखेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी महावीरनगर शाखेचे सल्लागार श्री. सतिश बाबुराव आरवाडे, श्री. अशोक कृष्णा फावडे यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर सभासद ठेवीदार मोठया संख्येने उपस्थित होते.

मालगांव शाखेचा वर्धापन देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला.  मालगांव शाखेच्या ठेवी ४ कोटी ३५ लाख झाल्या आहेत. ३ कोटी २५ लाखाचे कर्ज वाटप केले आहे.  संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्था ग्राहकांना सदैव चांगली सेवा देण्यास वचनबध्द असलेचे त्यांनी सांगितले. शाखेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्यामूळे या शाखेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करणेबाबत वार्षिक सभेत ठराव केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री महावीर रुकडे श्री. अजित भई सतिश वागळे रा. भरतेश्वर पाटील. श्री. अशोक पाटील, श्री अविनाश पाटील, प्रेमचंद भंडे, भरतेश्वर वागणे,
विष्णु पवार, राजेश बाहेती, किरण चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments