Daily Mahasatta

Daily Mahasatta

झिल इंटरनॅशनल स्कुलकडून सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

सांगली (प्रतिनिधी)
झिल इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज च्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने संस्थेचे संस्थापक मा.श्री एस एम काटकर सर , संस्थेचे सचिव मा.श्री जयेश काटकर सर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा.श्री प्रदीप खांडवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत देण्यात आली.

कसबे डिग्रज , मौजे डिग्रज , खटाव , सांगलवाडी, अंकली, अर्जुनवाड, ब्राम्हनाळ,पद्माळ या गावांमध्ये जवळपास २०१ किटचे वाटप करण्यात आले.  आटा, तांदूळ,रवा,साखर, चहापावडर, पोहे,चटणीपूड, शेंगदाणे,सर्व डाळी, साबण, फिनेल व कडीपेटीसह २७ दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचा समावेश असणारे १५०० रुपये किमतीचे एक किट तयार करण्यात आले होते.
   पुराच्या पाण्याने माघार घेताच रविवार दि. १ऑगस्ट रोजी प्रत्येक गावात जाऊन त्या त्या गावातील संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते गावातील अत्यंत गरजू व ज्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे अशा लोकांना ही मदत देण्यात आली. प्रामुख्याने अपंग, विधवा महिला व वृद्धांना मदत देण्याचा प्रयत्न संस्थेने केला. अल्पावधीत ही मदत पुरग्रस्ताना पोचवण्यासाठी झिल इंटरनॅशनल स्कुल चे प्रिन्सिपल मा. अल्फान्सो लॉरेन्स मॅडम, ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल मा. श्री संदीप पाटील सर , अडमिनिस्ट्रेटिव को ऑरडीनेटर मा.श्री विजय गीते सर आणि अकॅडेमिक   को ऑरडीनेटर मा. सौ मेघाली नरगच्चे मॅडम यांनी अचूक नियोजन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कामामध्ये मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments