Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या माजी जिल्ह्यप्रमुखांचे निधन


सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संदीप तमण्णा सुतार (वय ५२ रा.) त्रिकोणी बागेजवळ सांगली यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले.
    कै. संदीप सुतार यांनी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाढीसाठी चांगले प्रयत्न केले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन सन 2012 साली त्यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती. रविवारी रात्री संदीप सुतार यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सोमवारी सायंकाळी कै. संदीप सुतार यांच्या पार्थिवावर सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील, महेंद्र चांडाळ, माजी जि. प. सदस्य भीमराव माने, शंभूराज काटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते सुयोग सुतार यांचे ते थोरले बंधू तसेच सांगली महापालिकेच्या माजी महापौर गीता ताई सुतार यांचे ते थोरले दीर होत.

Post a Comment

0 Comments